आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Reason Behind 10th Examination Was Canceled In Maharashtra: The State Government Told The High Court That If 16 Lakh Students Went For The Exam, The Risk Of Infection Increases; News And Live Updates

दहावीची परीक्षा 'या' कारणांमुळे रद्द:16 लाख विद्यार्थी परीक्षेला गेले तर संक्रमणाचा धोका वाढेल - राज्य सरकार; राज्यात आतापर्यंत 6 लाख मुलांना कोरोनाचा संसर्ग

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परीक्षा रद्द केल्या - राज्य सरकार

देशासह महाराष्ट्र राज्यातही कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 6 लाख मुले कोरोनाच्या विळाख्यात आले आहे. यामधील 4 लाख मुले हे 11 ते 20 वर्षे वयोगटातील आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 10 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित याचिकेवरील सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयास सांगितले की, इयत्ता 10 वी मध्ये 16 लाख परिक्षार्थी असून हे जर परीक्षेला गेले तर संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेतला गेला असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले.

राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पुणे येथील रहिवाशी धनजंय कुळकर्णी यांनी ही जनहीत याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडून या निर्णयाबाबत स्पष्टीकरण मागितले होते.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परीक्षा रद्द केल्या - राज्य सरकार
राज्य सरकारने दाखल केलेल्या आपल्या पतिज्ञापत्रात म्हटले की, 10 च्या परीक्षेसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थी भाग घेणार असून यासाठी 4 लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. त्यासोबतच पोलिस बंदोबस्त आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश राहील. अशावेळी परीक्षेदरम्यान, विद्यार्थ्यांना कमीतकमी आठ ते नऊ वेळा परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. त्यासोबतच 10 वी पेक्षा 12 वीची परीक्षा अधिक महत्वाची आहे. कारण त्यानंतरच विद्यार्थी आपल्या करिअरची निवड करतात.

पेपरमुळे संसर्ग होण्याच्या धोका

दहावीच्या परीक्षेत विविध माध्यमाच्या 60 विषयांची सुमारे 158 प्रश्नपत्रिका असतात. कोरोनादरम्यान, उत्तरपत्रिकाही परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचणेही फार अवघड आहे. कारण कागदाच्या माध्यमातून कोरोना संसर्ग होण्याची भीती राज्य सरकारने आपल्या दाखल केलेल्या पतिज्ञापत्रात नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्याला परीक्षेसाठी किमान आठ ते नऊ वेळा पालकांसमवेत घराबाहेर पडावे लागते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना संक्रमणाचा धोका कायम राहू शकतो.

मुल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार - वर्षा गायकवाड
विद्यार्थांच्या आरोग्याला राज्याचे प्राधान्य देत मुल्यमापनद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे अंतर्गत लेखी मुल्यमापनाला 30 गुण, गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा याला 20 गुण तर विद्यार्थ्यांचा नववीचा विषय निहाय 50 गुण देण्यात येणार असल्याची माहितीदेखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

निकाल मान्य नसल्यास पुन्हा देता येईल परीक्षा
एसएससी मंडळामार्फत जून 2021 पर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा निकाल समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोव्हिड परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परिक्षा देता येणार आहे. विशेषतः पुन्हा परिक्षेला बसणाऱ्या (रिपीटर) आणि काही ठराविक विषय घेऊन परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मुल्यमापनाद्वारे उत्तीर्ण केले जाईल.

सीईटी देणाऱ्यांना 11 वी प्रवेशासाठी प्राधान्य
राज्यातील इयता 10 वीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे. तर 11 वी परीक्षेसाठी पर्यायी सीईटी घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ती देता येईल अशी सुविधा करण्यात आली आहे. ही सीईटी 100 गुणांची बहुपर्यायी ही परीक्षा असणार आहे. सीईटी देणाऱ्यांना 11 वी प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे आणि नंतर उर्वरित जागांवर अंतर्गत मूल्यमापन देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

विशेषतः ही सीईटी सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे. सीईटी साठीची तारीख लवकरच जाहीर करू यामध्ये देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...