आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेगा भरती:महाराष्ट्रात 12 हजार 500 पोलिसांची भरती, मंत्री मंडळाच्या बैठकीत सरकारचा मोठा निर्णय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या संकटात राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम झाला. आर्थिक अडचणीत आल्यामुळे सरकारनेही विविध भरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलिस भरतीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. कोविड काळात पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलिस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला.

अनिल देशमुखांनी याबाबत सांगितले की, ''आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात 12 हजार 500 पदांसाठी पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. भरतीची प्रक्रिया लवकर सुरू होईल.''