आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनलॉक प्रक्रिया:राज्यातील धार्मिक स्थळे लवकरच खुली होतील; जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्याकडून सूतोवाच

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉटेलमध्ये फिजिकल डिस्टन्स राखणे शक्य, मंदिरात अवघड, म्हणून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नव्हती - संजय राऊत
  • भाजपला मंदिरांची पण आघाडी सरकारला मंदिरासोबतच तेथे जाणाऱ्यांची सुद्धा काळजी - जयंत पाटील

राज्यातील रेस्टॉरंट व हॉटेल्स खुली झाल्यानंतर मुंबईतील उपनगरीय लोकल आणि धार्मिक स्थळे खुली करावीत, असा दबाव राज्य सरकारवर वाढत आहे. त्यासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लवकरच धार्मिक स्थळे खुली करण्याचे सूतोवाच केले आहे.

सोमवारापासून हॉटेल व रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भाजप व एआयएमआयएम हे पक्ष धार्मीक स्थळे खुली करण्याबाबत सातत्याने मागणी करत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यास प्रतिसाद दिला नव्हता. सध्या अनलॉक पाचमध्ये रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिली आहे.

भाजपला मंदिरांची पण आघाडी सरकारला मंदिरासोबतच तेथे जाणाऱ्यांची सुद्धा काळजी

भाजपला मंदिरांची काळजी आहे, पण आघाडी सरकारला मंदिरासोबतच मंदिरात जाणाऱ्यांची सुद्धा काळजी आहे. तरीही लवकरच योग्य तो विचार करून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील, असे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

हॉटेलमध्ये फिजिकल डिस्टन्स राखणे शक्य, मंदिरात ते अवघड

यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री स्वत: विविध धार्मिक संघटनांशी धार्मीक स्थळे उघडण्याबाबत बोलत आहेत. हॉटेलमध्ये फिजिकल डिस्टन्स राखणे शक्य आहे, मंदिरात ते अवघड आहे, म्हणून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नव्हती, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...