आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षा निकाल जाहीर, पुरवणी परीक्षेचा राज्याचा निकाल 27.31 टक्के; असा पाहा निकाल

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी तसेच बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी एक वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर झाला. ​​​​​दहावीचा निकाल 29.14 टक्के तर बारावीचा निकाल 25.87 टक्के इतका लागला आहे. पुरवणी परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 27.31 टक्के लागला आहे.

शिक्षण मंडळातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा घेणात आली होती. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीचा निकाल विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे यंदा पुरवणी परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.

उत्तर पत्रिकेच्या गुणपडताळणीसाठी गुरुवार (21 ऑक्टोबर 2021) ते शनिवार (30 ऑक्टोबर) या कालावधीत तर छायाप्रतीसाठी 21 ऑक्टोबर 2021 ते 9 नोव्हेंबर 2021 या काळात ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी अर्ज करु शकतात.

असा पाहू शकतात निकाल -
– विद्यार्थ्यांनी निकाल पाहाण्यासाठी आधी http://mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

बातम्या आणखी आहेत...