आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावनगर-काकीनाडा एक्स्प्रे्समध्ये दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी महिला प्रवाशांचे सोने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल लुटला असून याबाबत आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कोचमध्ये दरोडा
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमधील एस-1 एस-6, एस-7 या कोचमध्ये दरोडा पडल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ स्टेशनजवळ ही घडल्याचेही पोलिसांनी सांगितले. एक्स्प्रेस ट्रेन सावकाश होताच अज्ञात दरोडेखोरांनी रेल्वेमध्ये प्रवेश करत दरोडा टाकत धूम ठोकली. या घटनेनंतर रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लुटली
मंलठण हद्दीत भावनगर-काकीनाडा एक्स्प्रेस येताच एस-6,एस-7 या डब्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. अनेक प्रवासी यावेळी झोपी गेले होते, त्यांना काही समजण्याचा आतच दरोडेखोरांकडून प्रवाशांना दमदाटी करत त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेण्याचा प्रकार सुरू झाला. अंधारात आलेल्या 3 ते 4 दरोडेखोरांनी प्रवाशांच्या अंगावरील दागिणे चोरून नेले आहेत. यावेळी सुदैवाने कुणाला इजा झाली नसली तरी, प्रवाशी मात्र भेदरले होते. दरोडेखारे पळून जाताच प्रवाश्यांनी टीसींना सर्व प्रकाराची माहिती दिली. यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.
प्रवासी आराम करत असताना साधला डाव
भावनगर-काकीनाडा (क्रमांक-17222) ही एक्स्प्रेस 15 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास निघाली. दौंडवरून थेट सोलापूरला थांबा असल्याने अनेक प्रवासी आराम करत होते. मंलठण हद्दीजवळ येताच एक्स्प्रे्सचा वेग कमी झाला. दरोडेखोरांनी ट्रेक डाऊन केल्यामुळे एक्स्प्रेसचा वेग कमी झाला, अशीही माहिती समोर आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.