आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईडी आणि सीबीआयने आपला मोर्चा लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे वळवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जेव्हा एखाद्या योद्ध्याला मैदानात पराभूत करता येत नाही. तेव्हा त्याला षढयंत्र रचून त्रास दिला जातो आणि त्याचे धैर्य कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातो. तेजस्वी यादव तुमच्यासोबत हेच होत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो. लोकशाहीच्या या लढ्यात सर्वजण एकत्र आहेत.
दिल्लीत तेजस्वींच्या घरी ED
लँड फॉर जॉब घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी दिल्ली, नोएडा आणि पाटणा येथील 15 ठिकाणी छापे टाकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडीच्या टीमने लालू यादव यांच्या मुलींच्या दिल्लीतील घरांवरही छापे टाकले. यासोबतच ईडीचे पथक राजदचे माजी आमदार के अबू दोजाना यांच्या पाटणा येथील घरीही पोहोचले असून छापेमारी सुरू आहे. माजी आमदार अबू दोजाना हे बांधकाम व्यावसायिक असून लालूंच्या जवळचे आहेत. येथे वाचा संपुर्ण बातमी.
आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादव यांची भेट
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची पाटण्यात भेट घेतली आहे. तेजस्वी यांनी आदित्य यांचा यावेळी 'भाऊ' म्हणून उल्लेख केला. त्यानंतर तेजस्वीसोबत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भेटायला गेले. येथे तिन्ही नेत्यांमध्ये संभाषण झाले आणि येथून आदित्य ठाकरे विमानतळाकडे रवाना झाले.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर तेजस्वी म्हणाले की, सध्या लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.