आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजितदादांसाठी रोहित पवार मैदानात:म्हणाले- राज्यपालांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा शांत का बसले?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी महाराज धर्मवीर आहेच. मात्र स्वराज्य रक्षक हा व्यापक अर्थ आहे. दोन्ही शब्द आणि दोन्ही पदव्या या महत्त्वाच्या आहेत. अजितदादांनी बोलताना स्वराज्य रक्षक हा शब्द व्यापक अर्थाने वापरला. मात्र जेव्हा राज्यपालांनी महाराजांचा अपमान केला होता तेव्हा हेच भाजपवाले शांत का बसले होते? अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी भाजपला फटकारले आहे.

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होत. त्यावरून त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. आता राष्ट्रवादीकडूनही अजित पवारांची पाठराखण केली जात आहे.

शब्दात जाऊ नका

रोहित पवार म्हणाले, स्वराज्य म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केलं म्हणजे समतेच राज्य, सर्वसामान्य लोकांचं राज्य, रयतेचं राज्य निर्माण केलं. लोकांचं हित जोपासणं, महिलांना सुरक्षा देणं आणि या रयतेचं राज्य अजून कसं वाढेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरा धर्म होता. त्यामुळे मला वाटतं तुम्ही शब्दात जाऊ नका.

त्याग विसरुन चालणार नाही

पुढे रोहित पवार म्हणाले, दोन्ही शब्द आणि दोन्ही पदव्या या महत्त्वाच्या आहेत. अजितदादांनी बोलताना स्वराज्य रक्षक हा त्यादृष्टीने व्यापक अर्थ वापरला. त्यामुळे शब्दात खेळण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीसाठी बलिदान दिलं हे विसरू नका. त्यांचा त्याग विसरुन चालणार नाही. पदवीबद्दल आपण खूप बोलत बसलो तर व्यक्ती विसरुन जातो त्याचे कर्तृत्व विसरुन जातो.

त्यावेळी हेच शांत बसले होते

रोहित पवार पुढे म्हणाले, जेव्हा राज्यपालांनी शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केले होते त्यावेळी हेच ते व्यक्ती होते जे शांत बसले होते. जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रिबाई फुलेंविषयी बोलले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलले, यांचे दिल्लीचे प्रवक्ते होते त्यांनी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेव्हा हेच ते नेते होते जे शांत बसले होते. जेव्हा हे सर्व थोर पुरुषांबाबत बोलले तेव्हा तेव्हा आम्ही सर्वांनी एका विचाराने त्याला विरोध केला.

बातम्या आणखी आहेत...