आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलवर सट्टा लावल्याचे १४ लाख रुपये मिळावेत म्हणून तगादा लावल्याने ढोलउमरी येथे वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधील लाईनमेन तरुणाने त्याच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. साईराम देविदास रजेपवाड (२७, रा. तळेगाव ता. उमरी) असे मृताचे नाव आहे. साईरामचे वडिल देविदास यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उमरी येथील सतीश तुकाराम बादलवाडसह इतर तीन ते चार जण साईरामकडे सतत पैशांची मागणी करून मानसिक त्रास देत होते.
आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी गावात जाऊन साईरामला पैसे मागण्यात आले. त्यावेळी देविदास यांनीही पैसे देण्यासाठी वेळ मागितला होता. शेती विकून पैसे देतो, असे त्यांनी म्हटले होते. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळराव रांजनकर हे उमरीत तळ ठोकून आहेत. मुख्य आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. देविदास यांच्या फिर्यादीवरून गुरनं २४२/२० कलम ३०६ (३४) भादंविनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.