आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकणकरांचे जोरदार प्रत्युत्तर:'चंद्रकांतदादा, तुमचं जेवढं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द', चंद्रकांत पाटलांना रुपाली चणकरांचा टोला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपालांचे वय झाले आणि शरद पवार साहेब यांचे वय झाले नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर हल्लाबोल करताना केला होता, त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. पहिली गोष्ट राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्टी चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावं, असा खोचक टोला चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

तुम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज

दादा, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी तुम्हाला भेट नाकारली. याचं जरा आत्मचिंतन करा. तेव्हाच कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवर काय बोलावं याचं तुम्हाला भान येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

रुपाली चाकणकर काय म्हणाला?

बातम्या आणखी आहेत...