आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Rural Development Minister Hasan Mushrif Announced The Award Scheme For Corona Free Villeges; News And Live Updates

कोरोनामुक्त गाव स्पर्धा:50, 25 आणि 15 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही मिळणार; ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुरस्कार योजना केली जाहीर

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाहनचालकांचे पथक, हेल्पलाइन व लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल.

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकर कोरोनामुक्त व्हावीत, या माध्यमातून तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधताना कोरोना संसर्गाला वेशीवरच रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

अशी मिळतील बक्षिसे
कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाईल. राज्यातील ६ महसुली विभागांत प्रत्येकी ३ याप्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जातील. बक्षिसांची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.

चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशीर्ष पंचवीस पंधरा (२५१५) व तीस चोपन्न (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

योजनेची रूपरेषा अशी
1. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना करून त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत.

2. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करून त्यासाठी कार्यवाही करणारे पथक, कोरोना तपासणी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांचे पथक, हेल्पलाइन व लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल.

बातम्या आणखी आहेत...