आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदल्यांचे राजकारण:माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली केली- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. कोरोनासारख्या कठीण प्रसंगात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यावरुन भाजपकडून सरकारवर टीका केली जात आहे. यावर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'माजी मुख्यमंत्र्यांच्या मिठाला जागणाऱ्या काही अधिकाऱ्यांची बदली केली आहे,' असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे सरकारकडून काल पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 40 पेक्षा जास्त अधिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले. यावरुन सरकारवर विरोधकांनी अनेकवेळा टीका केली आहे. यालाच उत्तर देताना ,'काही अधिकारी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात खाल्लेल्या मिठास जगात होते. यामुळेच त्यांची बदली केली,' अशी प्रतिक्रीया मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील 45 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात एकूण 45 जणांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वाक्षरी केली. यात, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नाशिकला विश्वास नांगरे पाटील यांच्या जागी नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर, विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) येथे नियुक्ती झाली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिय आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे तेथेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत.

पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. तसेच, मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नियुक्ती नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती झाली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.