आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शांत, संयमी आहे नामर्द नाही:केंद्रीय संस्थांचा गैरवापर करून आमच्या कुटुंबाला टार्गेट केले जाते, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत; सूड काढायचेच असतील तर तुम्ही एक काढा आम्ही 10 सूड काढू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांची राजकारणात राहण्याची लायकी नाही'

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'साठी मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केला. 'संपूर्ण देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, त्यामुळेच सीबीआयला वेसण घातलं. दुरुपयोग व्हायला लागल्यावर अशी वेसण घालावीच लागतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

'मी शांत , संयमी आहे पण नामर्द नाही'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या एक वर्षपूर्तीनिमित्त सामनाला मुलाखत दिली. शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, 'मी शांत आहे, संयमी आहे. पण, याचा अर्थ असा नाही की, मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. कुटुंबीयांवर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदूळ नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू शकतो', अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना इशारा दिला.

'प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाणाऱ्यांची राजकारणात राहण्याची लायकी नाही'

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण, बिहार निवडणूक आणि त्यावर काही ठराविक पत्रकार आणि अभिनेत्री कंगना रनोटच्या प्रतिक्रियांवर प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी त्यांच्याकडे करुण नजरेने पाहतो. ज्यांना प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाण्याची सवय आहे, त्यांची राजकारणात राहण्याची लायकी नाही. एका तरुणाचा जीव गेला, त्याचे तुम्ही राजकारण करता ? किती खालच्या पातळीवर जात आहात. हीच तुमची लायकी ? हीच तुमची औकात ?'

' दुसरं म्हणजे, मला त्या अभिनेत्रीबद्दल बोलायचे नाही. मला तिच्यावर बोलायला वेळही नाही. त्या अभिनेत्रीकडून मुंबईची बदनामी झाली. तिने अशा शब्दात वर्णन केलेल्या मुंबईवर तुम्ही भगवा फडकवणार आहात, आणि तोही शुद्ध...सोडून द्या मला त्यावर बोलायचे नाही.'

महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधणे ?

या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, एक पत्रकार आहेत, पुण्यप्रसुन वाजपेयी. सध्या ते कुठे आहेत..? अशी यादी खूप मोठी आहे. तुमच्या विरोधात कुणी बोलले की, तुम्ही त्याच्या मागे संपूर्ण यंत्रणा लावता. या पत्रकारांवर का हल्ले झाले, का त्यांच्या नोकऱ्या गेल्या ? त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुणी हल्ले केले ?

एका मराठी उद्योजकाच्या मृत्यूची चौकशी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा होऊ शकतो ?

'महाराष्ट्रात मराठी माणसाने धंदा करायचा नाही का ? बाहेरील लोक येणार आणि मराठी माणसाला फसवणार आणि जर त्याने दबावात येऊन आत्महत्या केली आणि चिठ्ठीत काही नावे लिहून ठेवली आणि पोलिसांनी त्यांची चौकशी केली, तर त्याला तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले म्हणणारा का ? याविरोधात आवाज उठवणाऱ्यावर तुम्ही ईडीची चौकशी लावता . हे कदापि सहन केले जाणार नाही.

लव्हर जिहाद हा नवीन मुद्दा समोर आलाय...

'लव्ह जिहाद राजकारणात का नसावा ? लव्ह जिहाद आणि राजकारण दोन वेगळे विषय आहेत. पण, लव्ह जिहाद म्हणजे काय, तर मुस्लिम तरुणाने हिंदू तरुणीशी केलेला विवाह. तिकडे जम्मू-काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्तींबरोबर केलेली युती काय होती ? बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत, चंद्रबाबू नायडूंसोबत काय होतं? तुम्ही भिन्न-भिन्न विचारांसोबत केलेल्या युत्या, लव्ह जिहाद नाही, तर काय आहे ? ,' असे सवाल मुख्यमंत्र्यांनी केले.

लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याची भाजपची मागणी आहे

यावर मुख्यमंत्री म्हणाले की, 'आम्ही येस सर म्हणून कायदा करू. पण, मी अनेकदा बोललो आहे, आज परत सांगतो. तुम्ही काश्मीर ते कन्याकुमारी गोवंश हत्याबंदी कायदा करा. जिथे जिथे हे सुरू आहे, तिकडे हा कायदा करा. पण, तुम्ही फक्त ज्या राज्यात निवडणुका येतात, तिकडे असे मुद्दे उचलून धरता. ज्या राज्यात तुमचे सरकार आहे, तिकडे हा कायदा करा. असं सोयीचं हिंदुत्व आम्ही कधी केलं नाही...,'अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

संंबंधित बातम्या...

'त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही, त्यांची लायकी काय आहे ?' उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात

'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं'

'आडवे आलात, तर तुम्हाला आडवं करू; सत्ता नेहमीसाठी कोणाकडे राहत नाही'- उद्धव ठाकरे

'मुंबईकरांनी फडकवलेला भगवा कुणालाही जवळ येऊ देणार नाही'- मुख्यमंत्री

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser