आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Saamna Interview; 'If You Lie Down, We Will Lie Down; Power Does Not Belong To Anyone Forever ' Uddhav Thackeray

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनंदन मुलाखत:'आडवे आलात, तर तुम्हाला आडवं करू; सत्ता नेहमीसाठी कोणाकडे राहत नाही'- उद्धव ठाकरे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मला जेव्हा आव्हानं मिळतात तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते'

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'साठी मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केला. भलेभले अंगावर आले पण काय झालं ? महाराष्ट्राच्या वाटेला कुणी गेलं, त्याचं काय होतं याचे दाखले इतिहासात आहेत,' अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली.

'आडवे आलात, तर तुम्हाला आडवं करू'

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'मला जेव्हा आव्हानं मिळतात तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. महाराष्ट्राच्या मातीत एक चमत्कार आहे, तेज आहे. जेव्हा संकटे आली, आपत्त्या आल्या, भलेभले अंगावर आले पण काय झालं ? महाराष्ट्राच्या वाटेला कुणी गेलं, त्याचं काय होतं याचे दाखले इतिहासात आहेत. भविष्यात पाहायचे असतील तर, तेही पाहायला मिळतील. महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार नाही. कुणी कितीही आडवे आले तरी आडवे येणाऱ्यांना आडवं करुन महाराष्ट्र पुढं जाईल', असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

'सत्ता नेहमीसाठी कोणाकडे राहत नाही'

तुमच्या सूडचक्रात आम्हाला जायची इच्छा नाही. पण, तुम्ही तशी वेळ आणलीत तर तुम्ही आम्हाला हिंदुत्ववादी म्हणता ना मग ठीक आहे. तुमच्याकडे सूडचक्र आहे तर, आमच्याकडेही सुदर्शनचक्र आहे. आम्हीही मागे लावू शकतो. सुडाने वागायचं आहे का ? माझी आजही प्रामाणिक इच्छा आहे, हे असे विकृत बुद्धीचे चाळे करू नका. विकृती ही विकृती असते. त्या मार्गाने जायची आमची इच्छा नाही. आम्हाला भाग पाडू नका. राजकारण राजकारणासारखे करा. तुम्ही केवळ सत्तेचा दुरुपयोग करुन अंगावर येणार असाल तर सत्ता सदासर्वकाळ कुणाकडे राहात नसते. जनता ही मोठी ताकद आहे आणि खरी सत्ता ती असते. ती आमच्यासोबत आहे', असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser