आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'साठी मुलाखत दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका निवडणुकीवरही भाष्य केले.
'मुंबईकरांनी फडकवलेला भगवा कुणालाही जवळ येऊ देणार नाही'
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मुंबईकरांच्या विश्वासाची भक्कम तटबंदी महापालिकेच्या गडाभोवती आहे, म्हणून ज्यांना लढाई करायची खुमखुमी असेल त्यांनी या तटबंदीवर डोकं आपटून बघावं. भगवा उतरवणं सोडून द्या, त्याआधी त्यांनी या तटबंदीवर डोकं आपटून बघावं. मुंबईकरांनी फडकवलेला भगवा कुणालाही जवळपास येऊ देणार नाही,' असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.
'हिंमत असेल तर जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा फडकवा'
'शिवसेनेचा भगवा शुद्ध नाही असे भाजपचे म्हणणे आहे. हा भगवा शुद्ध नाही याची व्याख्या तुम्ही कशी कराल?' असा प्रश्न संजय राऊतांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'शिवसेनेचा भगवा शुद्ध नाही म्हणाऱ्यांनी बिहारमध्ये काय फडकवलंय? तिकडे कोणते फडके फडकवले? तिकडे का नाही भगवा फडकवत तुम्ही?' असे सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले. तसेच, 'हिंमत असेल तर जम्मू-कश्मीरमध्ये तिरंगा फडकून दाखवला', असे आव्हानही भाजपला दिले. 'काश्मीरात डोळे वर करुन बघण्याची हिंमत होत नाही. इतर ठिकाणी जी फडकवलीत ती फडकी कोणती आहेत तुमची? ती शुद्ध आहेत का? कोणा कोणाबरोबर कशा युत्या केल्यात तुम्ही? कशी तडजोड केलीत? बिहारमध्ये ‘संघमुक्त भारत’ म्हणणाऱ्या नितीशकुमारांसोबत तुम्ही युती केली, तो भगवा कोणता आहे तुमचा?' असे सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.