आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनंदन मुलाखत:'हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मंदिरे उघडणे आणि हिंदुत्व यांचा काही संबंध आहे का?'

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज्यपाल व भाजपाकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला. या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, 'जाऊ द्या, करू दे त्यांना मजा. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत,' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'मंदिरे उघडण्याच्या निमित्ताने हा विषय सुरुवातीला आला. आपण आता मंदिरे उघडलेली आहात, पण मंदिरे उघडणे आणि हिंदुत्व यांचा काही संबंध आहे का? मी शिवसेनाप्रमुखांचे आणि माझ्या आजोबांचे हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय,मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलंय.'

'बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतंय. ममंदिराचे श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही. मग हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणे आणि घंटा बडवणे आहे काय? निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व आणि तेही तुमचे दलालांचे हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका,' असा घणाघात ठाकरे यांनी विरोधकांवर केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser