आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नाव बदलण्याचा निर्णय:संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा साबळे वाघिरे कंपनीने घेतला निर्णय

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिडीचे नाव बदलण्यासाठी अनेक संघटना आंदोलन करत होते

काही दिवसांपासून संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांचे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला संभाजी बिडीचे नाव बदलण्यासाठी आंदोलन सुरू होते. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय साबळे वाघिरे कंपनीने घेतला आहे. कंपनीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव अशा पद्धतीने बिडीवर वापरले जाऊ नये, यासाठी संभाजी ब्रिगेड अनेक वर्षापासून मागणी करत होते. याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर आता साबळे वाघिरे कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघेरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.