आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sachin Sawant's Target On BJP, Said Dear Indians! On Guru Purnima, Please Do Not Consider Chowkidar As Your Guru

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोलेबाजी:सचिन सावंतांचा भाजपावर निशाणा, म्हणाले - प्यारे भारतवासियों ! गुरुपोर्णिमेला कृपया चौकीदाराला आपला गुरु मानू नका, अन्यथा....

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिन सावंतांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे चिमटा काढला आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने भाजपावर निशाना साधला आहे. प्यारे देशवासियो, आज गुरू पौर्णिमेच्या दिवशी चौकीदाराला आपला गुरू मानू नका, असा खोचक टोला सचिन सावंतांनी भाजपाला लगावला आहे.

सचिन सावंत यांनी गुरू पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या. यासोबतच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे चिमटा काढला आहे. देशावासियांनो, आज गुरू पौर्णिमा आहे. मात्र आज कृपया चौकीदाराल गुरू मानू नका. नाही तर कोट्यवधी रुपयांचे वस्त्र परिधान कराल, मौल्यवान आभुषणे अंगावर चढवाल आणि जन्मदात्या आईलाच रांगेत उभे कराल. आयुष्यभर खोटे बोसच राहाल, जनतेची दिशाभूल कराल, द्वेष पसरवाल, गरीबांच्या तोंडातला घास हिसकावून घ्याल आणि अदानी-अंबानीचं घर भराल, असा टोला सावंत यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

सचिन सावंत हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. खास करून चीनच्या मुद्द्यावरून सावंत यांनी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केलेली आहे. आता त्यांनी गुरु पोर्णिमेचे औचित्य साधून भाजपवर निशाणा साधला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser