आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थे (NIA)चा तपास सुरू आहे. बुधवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची एनआयएकडून साडेतीन तास चौकशी झाली. या प्रकरणातील कोठडीत असलेले माजी API सचिन वाझेंनाही NIA च्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी NIA ने अजून तपास करण्याचे सांगून कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आणि 9 एप्रिलपर्यंत वाझेंना NIA कस्टडीत पाठवण्यात आले. वाझेंसोबत मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले माजी काँस्टेबल विनायक शिंदे आणि गोरेला आज स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेंची रिपोर्टिंग थेट परमबीर सिंहांकडे होती. जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओ सापडल्याचे प्रकरणही परमबीर सिंह यांनीहीच वाझेंना दिले होते. या कारणामुळेच परमबीर सिंह यांना एनआयएने चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणानंतर परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलिय आयुक्त पदावरुन हटवण्यात आले होते. सध्या त्यांना होमगार्ड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तिकडे, 100 कोटींच्या वसुली प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या CBI टीमने आज NIA कोर्टात वाझेंच्या कस्टडीसाठी अपील केली होती. CBI च्या अपीलवर NIA ने गरज पडल्यास CBI ला वाझेची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.
परमबीर सिंह यांना विचारलेले 7 संभाव्य प्रश्न
1. 16 वर्षे निलंबित असलेल्य सचिन वाझेंना कुठल्या आधारावर पोलिस खात्यात परत घेण्यात आले?
2. गुन्हे शाखेत अनेक वरिष्ठ अधिकारी असताना वाझेंना थेट CIU चा हेड का बनवले ?
3. नियमांना बाजुला सारत वाझे थेट तुम्हाला रिपोर्टिंग का करत होते ?
4. पुन्हा पोलिस खात्यात घेताच महत्वाची सर्व प्रकरणे त्यांना का दिली ?
5. उपनिरिक्षक पदावर असलेल्या व्यक्तीचा एवढा मोठा थाट पाहून तुम्हाला कधी त्यांच्यावर संशय झाला नाही ?
6. अँटिलिया प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ज्यूरिडिक्शन नसतानाही वाझेंना तपास का दिला ?
7. सचिन वाझेंना स्पेशल पॉवर देण्याासठी कोणत्या नेत्याने दबाव टाकला होता का ?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.