आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:आता वाझेचा लेटरबॉम्ब; शिवसेनेलाही हादरे; पोलिस सेवेत कायम करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शरद पवारांना मला नोकरीवरुन काढायचे होते, नोकरी वाचवण्यासाठी देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितले'

अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने बुधवारी माजी पोलिस उपनिरिक्षक सचिन वाझेंना विशेष न्यायालयात हजर केले होते. एनआयएच्या मागणीवरुन कोर्टाने वाझेंच्या कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ केली. यावेळी सचिन वाझेंनी कोर्टासमोर एक पत्र सादर केले. हे पत्रातील बाबी त्यांनी NIA च्या कस्टडीत असताना सांगितल्या आहेत. यात वाझेंनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला आहे.

आपल्या पत्रात वाझेंनी पुढे म्हटले की, या सर्व वसुली प्रकरणाची माहिती अनिल देशमुखांच्या PA ला होती. याशिवाय, वाझेंनी अनिल देशमुखांवर नोकरी वाचवण्यासाठी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोपही केला आहे. वाझेंनी NIA ला सांगित्याप्रमाणे, 'मी 6 जून 2020 ला परत पोलिस खात्याच रुजू झालो होते. मला परत पोलिस खात्यात घेतल्यामुळे शरद पवार नाराज होते. त्यांनी माझे पुन्हा निलंबन करण्यास सांगितले होते. ही गोष्ट मला स्वतः अनिल देशमुख यांनी सांगितली होती. त्यांना माझी नोकरी टिकवण्यासाठी आणि शरद पवारांची समजुत काढण्यासाठी माझ्याकडून 2 कोटी रुपयांचा मागणी केली होती. इतकी मोठी रक्कम देण्याची माझी पात्रता नव्हती. ही रक्कम मला त्यांना पुन्हा देण्यास सांगितले. यानंतर त्यांनी माझी पोस्टिंग मुंबईच्या क्राइम इंटेलिजेंस यूनिट (CIU) मध्ये केली.'

अनिल परब यांनी एका ट्रस्टच्या चौकशीतून पैसे वसुली करण्यास सांगितले

सचिन वाझेंनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप लावले की, 'ऑक्टोबर 2020 मध्ये अनिल देशमुखांनी मला सह्याद्री गेस्ट हाउसमध्ये बोलावले. त्यापूर्वीच, जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये महाराष्ट्राचे परिवहान मंत्री अनिल परब यांनी मला आपल्या सरकारी बंगल्यावर बोलावले होते. त्याच आठवड्यात DCP पदाबाबत इंटरनल आर्डर देण्यात आले होते.'

वाझे पुढे म्हणाले की, 'या मीटिंगदरम्यान अनिल परब यांनी मला SBUT च्या ( Saifee Burhani Upliftment Trust) कंप्लेंटवर लक्ष देण्यास सांगितले. ती तक्रार तेव्हा प्रीलिमिनरी स्टेजवर होती. तसेच, मला SBUT च्या ट्रस्टीसोबत चौकशी बंद करण्यासाठी 50 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले होते. मी तेव्हा SBUT मध्ये कोणालाच ओळखत नव्हतो, म्हणून मी त्यांना ती वसुली करण्यास नकार दिला.

परब यांनी 50 कंपन्यांकडून 2-2 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले

अनिल परब यांच्यासोबतच्या एका भेटीचा उल्लेख करताना वाझे म्हणाले की, 'जानेवारी 2020 मध्ये त्यांच्या सरकारी बंगल्यावर बोलावले होते आणि BMC मध्ये लिस्टेड Praudulant contractor विरोधात तपास चालवण्यास सांगितला होता. त्यांनी अशाच 50 लिस्टेड कंपन्यांकडून प्रत्येकी 2 कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले होते.'

अनिल देशमुखांनी 1650 पब आणि बारकडून वसुली करण्यास सांगितले

वाझे पुढे म्हणाले की, जानेवारी 2021 मध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मला आपल्या सरकारी बंगल्यावर बोलावले होते. तेव्हा त्यांचा PA कुंदनदेखील तिथे उपस्थित होता. यावेळी त्यांनी मला मुंबईतील 1650 पब, बारकडून दर महिना 3 लाख रुपये वसुली करण्यास सांगितले होते. हा सर्व प्रकार माझ्या क्षमतेच्या बाहेर असल्याचे मी त्यांना त्यावेळेसच सांगितले होते. तेव्हा PA कुंदनने मला म्हटले होते की, आपली नोकरी वाचवायची असेल, तर अनिल देशमुख जे सांगत आहेत, ते करा.'

बातम्या आणखी आहेत...