आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sachin Vaze Mukesh Ambani Antilia Case; How Sachin Waze Saved His Life From National Investigation Agency (NIA) Entry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लूसिव्ह:NIA मुळे वाचला सचिन वाझेंचा जीव; आपल्याच जाळ्यात अडकला मुंबईचा एक्स-कॉप ?

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाझेचे स्टेटस आल्यानंतर NIA ने अटक केले

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटिलिया घराबाहेर स्कॉर्पियो गाडीत आढळलेल्या जिलेटिन प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या घटनेला आता एक महिना झाला असून, अद्याप राष्ट्रीय तपास संस्था (NIA), दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि मुंबई पोलिस या प्रकरणाचा छडा लावू शकले नाहीत. याशिवाय, एक लहान पोलिस अधिकारी येवढा मोठा कट कसा रचू शकतो, ?

भास्करने या प्रकरणाशी संबंधित बाबींचा शोध घेतला असता अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. टॉप सोर्सेसनुसार, या प्रकरणाच्या अनेक बाजू आहेत. त्या बाजू समोर येतील का नाही, हे कुणालाच माहीत नाही. आम्ही या प्रकरणाची संबंधित काही प्रश्न तुमच्यासमोर ठेवत आहोत...

सचिन वाझे हा फक्त मोहरा आहे

मुंबई पोलिसांच्या उच्च सूत्रांनी सांगितल्यानुसार, या प्रकरणात सचिन वाझे फक्त एक मोहरा आहे. कारण एक सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) इतक्या मोठ्या घटनेमागचा सुत्रधार असूच शकत नाही. या प्रकरणामागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे. सचिन वाझे स्वतःही याबाबत सांगत आहेत. बुधवारी NIA च्या स्पेशल कोर्टात सचिन वाझेने सांगितले होते की, त्यांना बळीचा बकरा बनवले जात आहे.

सचिन वाझे स्वतः इतका मोठा कट रचू शकत नाही

महाराष्ट्रातील एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, सचिन वाझेकडे पैसे किंवा मोठा सोर्स नाही, की तो इतका मोठा कट रचू शकतो. या प्रकरणात सचिन वाझे दुसरा कुणी अडकेल, असा एकही खुलासा करणार नाही. पण, यासाठी तीन एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

हा एक मोठा कट आहे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, हा खूप मोठा कट आहे. सचिन वाझेला अडकवण्यात आले आहे, त्यांच्या मागचे खरे सुत्रधार समोर आले पाहिजेत. फडणवीसांनी खूप आधीपासून या प्रकरणात NIA चौकशीची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, या घटनेला हलक्यात घेतले जाऊ नये.

सचिन वाझेने काहीच मान्य नाही केले

ATS आणि NIA ने आतापर्यंत केलेल्या तपास आणि चौकशीत सचिन वाझेने या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे म्हटले आहे. NIA नेदेखील हीच गोष्ट कोर्टात सांगितली आहे. म्हणूनच कोर्टाने सचिन वाझेला तीन एप्रिलपर्यंत कोठडीत पाठवले आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, सचिन वाझेद्वारे या प्रकरणात पैसे वसुलीचेच खरे कारण आहे. तसेच, सचिन वाझेला एनकाउंटर सारखी परिस्थिती बनवून हिरो बनायचे होते, असाही एक दावा करण्यात येत आहे.

वाझे आत्महत्या करणार होते का ?

या गोष्टीची शक्यता खूप जास्त होती. कारण, सचिन वाझे यांनी 13 मार्चला आपल्या वॉट्सअॅपवर एक स्टेटस टाकला होता. त्यांनी त्यात लिहीले होते की, '3 मार्च 2004 ला CID मधील माझ्या साथीदारांनी खोट्या आरोपाखाली मला अटक केली. ते प्रकरण अद्याप संपले नाही, यातच अजून एक प्रकरण माझ्या आयुष्यात आले आहे. माझे साथीदार परत एकदा मला जाळ्यात ओढत आहेत. तेव्हा माझ्याकडे 17 वर्षांचे धैर्य, आशा, जीवन आणि सेवा होती. पण, आता माझ्याकडे 17 वर्षांचे आयुष्य आणि सेवा नाही. आता जगाला निरोप देण्याची वेळ आली आहे.’

वाझेचे स्टेटस आल्यानंतर NIA ने अटक केले

13 मार्चला सकाळी हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर दुपारी NIA ने सचिन वाझेंना अटक केले. एनआयएला संशय होता की, वाझेंनी आत्महत्या केल्यास या प्रकरणाचा छडा लावता येणार नाही. या गोष्टीट शक्यता आहे की, त्या दिवशी एनआयएने त्यांना अटक केली नसती, तर त्यांची अवस्थाही मनसुख हिरेन यांच्याप्रमाणेच झाली असती. त्यांनाही मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे मारले जाऊ शकत होते. त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की, सचिन वाझे यांच्या मागचा खरा सुत्रधार कोण आहे ?

बातम्या आणखी आहेत...