आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sachin Vaze Mukesh Ambani Antilia Security Mansukh Hiren Murder Case Update NIA: Number Plates Recovered From Mithi Of Stolen Vehicle

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण:NIA कडून सचिन वाझेची सातवी कार जप्त, याच कारमध्ये मनसुख हिरेन यांची हत्या केल्याचा संशय

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मित्सुबिशी कंपनीच्या या कारचा वापर सचिन वाझेचा सहकारी API प्रकाश ओवल करत होता

अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने मंगळवारी नवी मुंबईतील कमोठे परिसरातून एक कार जप्त केली आहे. या कारचा वापर सचिन वाझेचा सहकारी API प्रकाश ओवल करत होता. NIA ला संशय आहे की, याच कारमध्ये मनसुख हिरेनची हत्या झाली असावी. आतापर्यंत जप्त केलेल्या 7 कारपैकी ही पहिलीच कार अशी आहे, जी सचिन वाझेच्या नावावर रडिस्टर्ड आहे. ही मित्सुबिशी कंपनीची आउटलँडर कार 2011 मध्ये रजिस्टर्ड केली होती.

यापूर्वी एनआयएच्या पथकाने रविवारी मुंबईच्या मीठी नदीतून एक काँप्यूटर हार्ड डिस्क, DVR, CD, एका गाडीच्या दोन नंबर प्लेट आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक उपकरण जप्त केले आहे. या नंबर प्लेटबाबत नवीन खुलासा झाला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण:मिठी नदीत सापडलेली नंबर प्लेट जालन्यातील चोरी झालेल्या कारची, अँटिलिया प्रकरणात याच्या कनेक्शनचा तपास सुरू

एनआयएला माहिती मिळाली आहे की, ही कार राज्याच्या समाज कल्याण विभागात क्लर्क म्हणून काम करणाऱ्या जालन्याच्या विनय नाडे यांच्या चोरी झालेल्या 'मारुती इको'ची आहे. ही कार औरंगाबादमधून चोरी झाली होती आणि चोरीची तक्रार 20 नोव्हेंबर 2020 ला औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.

मीठी नदीत सापडल्या कॉम्प्यूटर CPU सह कारच्या 2 नंबर प्लेट

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) रविवारी या प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिस विभागातील निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक(API) सचिन वाझेला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सजवळील मीठी नदीच्या पुलावर घेऊन गेले. एनआयएचे म्हणणे आहे की, सचिन वाझेने हार्ड डिस्क याच नदीत फेकून दिली आहे.

यावेळी नदीवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी 12 पाणबुड्यांच्या मदतीने मीठी नदीत शोध घेतला. यावेळी मीठी नदीतून पाणबुड्यांना कॉम्प्यूटर CPU, लॅपटॉप आणि 2 नंबर प्लेट आणि इतर महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...