आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sachin Waze, Antilia Case News And Updates, No Matter How Hard Sharad Pawar And Anil Deshmukh Try, The Truth Will Not Be Hidden Girish Bapat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवारांवर निशाणा:शरद पवार आणि अनिल देशमुखांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही- गिरीश बापट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीस यांचे सर्वांवर लक्ष आहे

सध्या राज्यात सचिन वाझे आणि अँटीलिया प्रकरणावरुन विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर भाष्य केले. यानंतर आता भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

मंगळवारी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गिरीश बापट म्हणाले की, 'शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते जमणार नाही. प्रसारमाध्यमे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही सर्व माहिती समोर येईल. देवेंद्र फडणवीस मुंबईत बसून साऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे येत्या काळात 'दूध का दूध, पानी का पानी' होईल, असे गिरीश बापट म्हणाले.

बापट पुढे म्हणाले की, 'राज्यात भ्रष्टाचार आणि दुराचार वाढला आहे. माणसे बदलली तरी वृत्ती बदलत नाही. राज्यात सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून खंडणी वसूल करणे योग्य नाही, हा गंभीर प्रश्न आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपात किती तथ्य आहे, हा मूळ मुद्दा आहे, असेही बापट म्हणाले की.

बातम्या आणखी आहेत...