आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sachin Waze, Antilia, Mansukh Hiren Death Case\ Chief Minister Uddhav Thackeray Is Godfather Of Sachin Waze, He Should Resign First Narayan Rane

राणेंचा हल्लाबोल:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाझेचे गॉडफादर, आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नारायण राणे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन सचिन वाजेंना पोलिस विभागात परत घेतले'

सध्या राज्यात सचिव वाझे प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरुन विरोध सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत आहेत. या प्रकरणामुळेच मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली. आता यावरुन भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'उद्धव ठाकरे सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही', अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

नारायण राणेंनी संसद भवनात मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सचिन वाझे आधी निलंबित होते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना डिपार्टमेंटमध्ये परत घेतले. परत घेतल्यानंतर थेट त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचे दिसून येते, असे नारायण राणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा...

राणे पुढे म्हमाले की, 'मुख्यमंत्र्यांनी वाझेंकडून सर्व कामे करून घेतली. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणे वाझेंकडे देण्यात आली होती. संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणे का दिली?' असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...