आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटीलिया प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर भाजपने राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट देण्याच आरोप लागले आहेत. तर आता प्रश्न उपस्थित होतो की, देशमुख ही वसुली आपल्यासाठी करत होते, का राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसाठी करत होते ? जर गृहमंत्र्यांचे टार्गेट 100 कोटी होते, तर इतर मंत्र्यांचे किती होते ? फक्त मुंबईतून 100 कोटींची वसुली हवी होती, तर राज्यातील इतर मोठ्या शहरांसाठी किती टार्गेट दिले आहे ?
'हा भ्रष्टाचार नाही, ऑपरेशन लूट'
रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, सचिन वाझे कुणाच्या दबावात होते. शिवसेना, मुख्यमंत्री का शरद पवारांच्या दबावात ? हे फक्त भ्रष्टाचाराचे प्रकरण नाही, हे ऑपरेशन लूट आहे. वसुली गुन्हा आहे, याप्रकरणी सत्ताधारी शरद पवारांना ब्रीफ करत आहेत. शरद पवार सत्तेत नाहीत, तर मग सर्वजण शरद पवारांना ब्रीफींग का करत आहेत ? , असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे गृहमंत्री वाझेंना शंभर कोटींचे वसुली टार्गेट देतात. एका इंस्पेक्टरच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांना यावे लागते. वाझेला का वाचवले जात आहे ? सचिन वाझेकडे असे कोणते गुपित आहेत, जे बाहेर आल्यावर सरकारला धोका निर्माण होईल ? हे गंभीर प्रकरण आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी व्हायला हवी, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.