आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sachin Waze Mukesh Ambani Antilia House Case | Who Is Maharashtra Assistant Police Inspector Sachin Waze? Latest News And Update

सचिन वाझेंचे वादाशी जुने नाते:17 वर्षांपूर्वी कस्टडीत झालेल्या ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर 16 वर्षांसाठी झाले होते सस्पेंड

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये चौकशीदरम्यान ख्वाजा यूनुसचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला होता. - Divya Marathi
घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये चौकशीदरम्यान ख्वाजा यूनुसचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला होता.
  • मागच्या वर्षी जूनमध्ये पोलिस खात्यात रुजू झाले होते

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पियो गाडी आढळली होती. यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी रविवारी राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने क्राइम इंटेलिजेंस यूनिटचे माजी हेड सचिन वांझेना अटक केली आहे आणि आज त्यांचे पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आले. परंतु, वाझे आणि वादाचे नाते जुने आहे. 63 पेक्षा जास्त एनकाउंटर केलेले सचिन वाझे 17 वर्षांपूर्वी 3 मार्च 2004 लाही कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यूप्रकरणी सस्पेंड झाले होते. 16 वर्षे सस्पेंड राहिल्यानंतर 6 जून 2020 मध्ये त्यांना पुन्हा पोलिस खात्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस खात्यात पुन्हा रुजू केल्यावरुन भाजप सतत शिवसेनेवर निशाणा साधत आहे.

25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील अँटीलियाबाहेर स्फोटके असलेली एक स्कॉर्पियो गाडी आढळली होती.
25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील अँटीलियाबाहेर स्फोटके असलेली एक स्कॉर्पियो गाडी आढळली होती.

घाटकोपर ब्लास्ट प्रकरणात झाले होते निलंबन

2 डिसेंबर 2002 ला मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एक ब्लास्ट झाला होता. यात 2 जणांचा मृत्यू झाला होता, तर 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. त्यादरम्यान एम.एन सिंह मुंबई पोलिस कमिश्नर होते. याच प्रकरणात सचिन वाझे आणि त्यांच्या पथकाने डॉ. मतीन, मुजम्मिल, जहीर आणि ख्वाजा यूनुसला POTA (प्रिवेंशन ऑफ टेररिज्म अॅक्ट 2002) अंतर्गत अटक केले होते.

ख्वाजा यूनुस परभणीचा रहिवासी होता आणि तेव्हा त्याचे वय 27 वर्षे होते. युनूस एक इंजीनियर होता आणि तेव्हा तो दुबईत काम करायचा. 28 नोव्हेंबर, 2002 मध्ये तो आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आला होता. तो 30 नोव्हेंबरला परभणीत आला आणि 2 डिसेंबरला घाटकोपर स्टेशनवर स्फोट झाला.

ख्वाजा यूनुसची आई आयशा बेगम यांच्या याचिकेनुसार, युनूसला 25 डिसेंबर, 2002 ला चिकलधाराजवळून ताब्यात घेतले होते. त्याला इतर आरोपींसोबत घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणाता तपास घाटकोपर पोलिस स्टेशन आणि पवई पोलिस स्टेशनमध्ये झाली होती.

यूनुसची आई आयशा बेगमने हायकोर्टात सांगितले होते की, दोन्ही पोलिस स्टेशनमध्ये सूनुसला मारहाण झाली होती. 6 जानेवारी, 2003 ला डॉ. मतीन, ख्वाजा यूनुस आणि जहीरची घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये दुपारी 12.00 ते 1.30 पर्यंत चौकशी करण्यात आली होती. कुटुंबाचा आरोप होता की, यादरम्यान युनूसला प्रचंड मारहाण झाली होती.

डॉ. मतीनने लॉकअपमध्ये टॉर्चर केल्याचे सांगितले होते

युनूसच्या कुटुंबाच्या आरोपांची पुष्टी ख्वाजासोबत अटक झालेल्या डॉ. मतीननेही केली होती. मतीनने सांगितले होते की, तीन ते चार पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली होती. त्याच्या पोटावर लाथा मारल्या आणि त्यात त्याची हाडे मोडली. मतीनने संशय व्यक्त केला होता की, याच मारहाणीत ख्वाजाचा मृत्यू झाला होता. डॉ. मतीन एक डॉक्टर होता आणि त्याने आपल्या करिअरमध्ये अनेक पोस्ट मॉर्टम केले होते. त्यामुळेच, कोर्टात त्याच्या साक्षीला खूप महत्व आले होते. डॉ. मतीनच्या म्हणण्यानुसार, युनूसचा मृत्यू 6 जानेवारी 2003 ला दुपारी 2 वाजता घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये झाला होता.

सचिन वाझेंच्या पथकाने दिली होती फरार झाल्याची थेअरी

त्यावेळेस मुंबई पोलिसांनी दावा केला होता की, चौकशीसाठी त्याला औरंगाबादमध्ये नेत असताना तो फरार झाला होता. सचिन वाझे आणि त्यांच्या पथकाने सांगितले होते की, ब्लास्ट प्रकरणाच्या तपासासाठी ख्वाजाला मुंबईवरुन औरंगाबादकडे घेऊन जात असताना लोनावळा पोलिस स्टेशनजवळ गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी युनूस पोलिसांना चकवा देत पळून गेला होता.

हायकोर्टाच्या आदेशानंतर CID ने केला होता तपास

ख्वाजा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईने हायकोर्टात दाद मागितली. यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता. CID च्या तपास आणि डॉ. मतीनच्या साक्षीनंतर युनूसचा मृत्यू कोठडीत झाल्याची पुष्टी झाली होती. यानंतर 3 मार्च 2004 ला न्यायालयाच्या आदेशावरुन सचिन वाझे आणि काँस्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकमला सस्पेंड करण्यात आले होते.

आजपर्यंत मिळाली नाही ख्वाजा युनूसची बॉडी

यानंतर विशेष पोटा कोर्टाने या प्रकरणात अटक केलेल्या मुजम्मिला पुराव्या अभावी निर्देष सोडले. इतर आरोपींवर सध्या केस सुरू आहे. ख्वाजाच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. आजही ख्वाजाची आई आयशा बेगम न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. विशेष म्हणजे, तेव्हापासून आजापर्यंत ख्वाजाची बॉडी सापडलेली नाही.

शिवसेनेत सामील झाले वाझे

निलंबनाच्या तीन वर्षानंतर सचिन वाझेंनी 2007 मध्ये पोलिस विभागातून राजीनामा दिला होता. पण, त्यांच्याविरोधात तपास सुरू असल्यामुळे त्यांचा राजीनामा मंजुर करण्यात आला नव्हता. यानंतर 2008 मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

बातम्या आणखी आहेत...