आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरणात मोठी कारवाई:सचिन वाझेविरोधात NIA ने लावला यूएपीए; वाझेंच्या सोसायटीमधून CCTV फुटेज जप्त करणारा काजी बनला सरकारी साक्षीदार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाझेंकडे 5 बॅग होत्या, एका बॅगेत जिलेटिन ठेवल्याचा संशय

अँटिलिया प्रकरणात बुधवारी राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने मुंबई पोलिसातील निलंबित API सचिन वाझेंविरोधात UAPA लावण्यात आला आहे. ही कलम दहशतवादी कारवायांतर्गत लावली जाते. तर, राष्ट्रीय तपास संस्थेने विशेष न्यायालयाला सांगितले की, वाझेंसोबत काम करणारे रियाज काजी सरकारी साक्षीदार बनवण्यास तयार आहेत. NIA ने काजीची 4 वेळेस चौकशी केली असून, वाझेंच्या सोसायटीची CCTV फुटेज जप्त करण्यात काजीचा हात होता.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात NIA ने दोन आरोपींची कस्टडी घेतली आहे. मुंबई ATS ने या दोन आरोपींना अटक केली होते. ATS ने अटनेंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा सोडवल्याचा दावा केला होता. ATS ने हिरेन यांच्या हत्या प्रकरणात निलंबित पोलिस विनायक शिंदे आणि क्रिकेट सट्टेबाज नरेश गौडला मागच्या आठवड्यात अटक केले होते. यापूर्वी ठाणे सेशन कोर्टाने महाराष्ट्र अँटी टेररिज्म स्क्वॉड (ATS) ला आदेश दिले की, या प्रकरणाता संपूर्ण तपास राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) कडे द्यावा.

वाझेंकडे 5 बॅग होते, एका बॅगेत जिलेटिन ठेवल्याचा संशय

CCTV फुटेजच्या तपासात समोर आले की, वाझे जेव्हा हॉटेलमध्ये आले होते, तेव्हा त्यांच्याकडे पाच बॅग होते. यातील एका बॅगेत जिलेटिन होते. तसेच, त्यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलेला या संपूर्ण प्रकरणाची माहिती असल्याचाही संशय आहे.

NIA ला वाझेंचे बनावटआधार कार्ड मिळाले

NIA च्या तपासात समोर आले आहे की, वाझेंनी आपले बनावट आधार कार्ड बनवले होते. त्या कार्डमध्ये फोटे वाझेंचा आणि नाव सुशांत सदाशिव खामकर असे आहे. संशय आहे की, या आधार कार्डद्वारे वाझेंनी अनेक ठिकाणी हॉटेल बुकींग केली.

बातम्या आणखी आहेत...