आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंचा गंभीर आरोप:सचिन वाझे आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांकडून पैसे घेतात आणि त्यात वरुण सरदेसाईंचा हिस्सा असतो- नितेश राणे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन वाझे आणि सरदेसाईंवर गंभीर आरोप केले आहेत

सध्या राज्यात अँटीलिया स्फोटके, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना सतत धारेवर धरत आहेत. यावरुनच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी सचिन वाझे आणि शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सचिन वाझेंनी आयपीएलच्या सट्टेबाजांकडून दीडशे कोटींची खंडणी मागितली होती, असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे. तसेच, या प्रकरणाचीही एनआयएने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

नितेश राणेंनी आज भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, 'देशात चांगल्या हेतूने आयपीएलचे सामने खेळवले जातात. त्यातून नवोदित क्रिकेटपटूंनाही वाव मिळत आहे. मात्र, या आयपीएलवर सट्टा लावण्यात येतो आणि वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. तुमचे लोकेशन आणि तुमची सर्व माहिती मला माहीत आहे. तुमच्यावर छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या, अशी धमकी वाझेंकडून या सट्टेबाजांना दिली जात होती', असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

'पैशांमध्ये वरुण सरदेसाईंचा हिस्सा'

नितेश राणे पुढे म्हणाले की, सचिन वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस म्हणजे, वरुण सरदेसाई आहे. वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणे झाले याची माहिती घेण्यात यावी.. सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही', असे राणे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...