आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांवर निशाणा:'शरद पवार क्रिकेट न खेळता क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते, कुस्ती न खेळता कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत'- सदाभाऊ खोत

सातारा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'रिहानाने आपल्या देशातील लोकांचा विचार करावा'

कृषी आंदोलनावर सेलिब्रिटिंनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माजी क्रिकेटर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना कोणत्याही विषयावर भाष्य करण्यापूर्वी काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. यावरुन आता रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. 'शरद पवारांनी कधी क्रिकेट खेळले होते का?' असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, 'शरद पवारांनी कधी क्रिकेट खेळले होते का ? तरी ते क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते. त्यांनी कधी कोणत्या फडात कुस्ती खेळली का? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे,' अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

आपल्या देशातील लोकांचा विचार करावा

सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांसोबतच पॉपस्टार रिहानावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, रिहाना हिने कायतरी ट्विट केले आहे., तिला भारतातील शेतकऱ्यांचा कळवळा आला. ती ज्या खंडात राहते तिथ काही लोक अर्ध पोटी राहतात, त्याबद्दलही कधी ट्विट करायला पाहिजे होते', असे सदाभाऊ खोत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...