आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कृषी विधेयकाचे गुढी उभारून स्वागत करणार, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोतांची माहिती

सांगली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजू शेट्टींनी शेतकऱ्यांशी असलेली नाळ पूर्णपणे तोडली, ते व्यापारी व दलालांशी नाळ जोडताना दिसताहेत

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन विधेयके मंजूर केली आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी शुक्रवार, २५ रोजी राज्यातील प्रत्येक गावात शेतकरी गुढी उभी करून स्वागत करतील, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राजू शेट्टी यांच्यावर आरोप

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या या विधेयकाला राजकीय हेतूने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जो विरोध दर्शवला आहे तो राजकीय उद्दिष्टाने आहे. राजू शेट्टी हे आता शेतकऱ्यांचे नेते न राहता शेतीमालाचे दलाल व साखरसम्राटांचे नेते झाले आहेत, असा आरोप करून खोत म्हणाले की, राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी असलेली नाळ गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे तोडली आहे. आता ते व्यापारी व दलालांशी नाळ जोडताना दिसत आहेत. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबाबत टाहो फोडणाऱ्या या नेत्याने गुलामी पत्करली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

येत्या २५ सप्टेंबर रोजी डाव्या विचारांचे कार्यकर्ते आणि काही संघटना या शेतकऱ्यांच्या बिलाला विरोध करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्याच वेळी आम्ही रयत संघटनेच्या माध्यमातून बिलाचे स्वागत करायला रस्त्यावरच नव्हे, तर शेतावरही उतरणार आहोत. ७० वर्षांच्या कालावधीत प्रथमच शेतकरी हिताचा कायदा मंजूर करणाऱ्या मोदी सरकारचे समर्थन करण्यासाठी शेतात गुढ्या उभ्या करून या स्वागत करणार आहोत.

धनगर आरक्षण : सरकार झोपेचे साेंग घेतेय : पडळकर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार धनगर आरक्षणाबाबत झोपेचे सोंग घेत आहे. सरकारला जागे करण्यासाठी येत्या २५ सप्टेंबर रोजी राज्यव्यापी ढोल बजाव आंदोलन छेडणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

गेल्या दशकापासून धनगर समाज आरक्षण मागणीसाठी आंदोलन छेडत आहे. मात्र, राज्य सरकारला या प्रश्नाबाबत जाणीवही नाही. राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत कोणतीही पावले उचलली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...