आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sahitya Akademi Youth Award Winning Writer Navnath Gore Lost His Job Due To Lockdown And Now Earns Rs. 200 Per Day By Daily Working

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुळे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक नवनाथ गोरे यांच्यावर हाती कुदळ घेऊन पोट भरण्याची वेळ

गणेश जोशी | सांगली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे नोकरी गेली, आता मोलमजुरी करून दररोज कमावतात 200 रुपये

जीवनातील कटू वास्तवावर आधारित ‘फेसाटी’ कादंबरी लिहून देशभरातील साहित्यिक विश्वात आपला ठसा उमटवणारे साहित्यिक प्रा. नवनाथ गोरे यांच्यावर सध्या लेखणीऐवजी हातामध्ये कुदळ, फावडे घेण्याची वेळ आली आहे. कोरोनाची साथ, त्यापाठोपाठ झालेले लॉकडाऊन यामुळे गोरे यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आणि नंतर सुरू झाली ससेहोलपट.

सन २०१८ मध्ये साहित्य विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला मिळाला होता. जीवनातील कटुसत्यावर भाष्य करणारी कादंबरी अशा शब्दांत अनेक साहित्यिकांनी त्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. गोरे यांची ही कादंबरी प्रचंड गाजली. घरात अठराविश्वे दारिद्य्र असलेल्या नवनाथ यांचे या कादंबरीने आयुष्य बदलले.

कादंबरीच्या यशानंतर त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील लोणी या गावी पद्मभूषण विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात तासिका तत्त्वावर सहयोगी प्राध्यापकाची नोकरी लागली. दरमहा १० हजार रुपये वेतन त्यांना मिळत होते. आयुष्याचा गाडा रुळावर आला. हा आनंद फार काळ टिकला नाही. परंतु अवघ्या सहा महिन्यांनंतर कोराेना आला, पाठोपाठ लॉकडाऊन लादले गेले. त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यानंतरच्या ‘लॉकडाऊन’च्या सहा महिन्यांच्या काळात आपले कुटुंब चालवण्यासाठी त्यांच्यावर मोलमजुरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सध्या दिवसाला आठ ते दहा तास राबून अवघ्या २०० रुपयांवर त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे.

कलावंतांप्रमाणे लेखकांनाही मानधन द्या : गोरे

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात निगडी बुद्रुक या गावातील नवनाथ यांनी मोठ्या कष्टाने एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. घरात वृद्ध आई, मोठा अपंग भाऊ व शिक्षण घेणाऱ्या लहान भावांचे कुटुंब आहे. सरकारने कलावंतांप्रमाणेच लेखकांनाही मानधन द्यावे, असे ‘दिव्य मराठी’ शी बोलताना नवनाथ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...