आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमय्यांचा भावना गवळींवर निशाणा:म्हणाले- भावना गवळी तिसऱ्यांदा ईडी चौकशीला गैरहजर; किती दिवस पळणार, अखेर 100 कोटींचा हिशोब तर द्यावाच लागणार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने अनेक वेळा चौकशीसाठी हजर राहायला सांगितले होते, मात्र त्या हजर राहिल्या नाहीत. या आधी समन्स वेळेवर मिळाला नाही म्हणत आणखी 15 दिवसांचा वेळ भावना गवळी यांनी मागितला होता. मात्र तरीही त्या ईडी समोर हजर राहिल्या नाहीत. आजही त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, चौकशीसाठी पोहोचल्या नाहीत. असे सांगत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर सध्या ईडीची कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर 100 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली आहे.

काय आहे प्रकरण?
भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतले होते मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती, असा दावा देखील त्यांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...