आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना औषध:राज्य सरकारचा रामदेव बाबांच्या पतंजलीला दणका; 'कोरोनिल'च्या विक्रीस महाराष्ट्रात बंदी

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाबा रामदेव यांनी कोरोनावरील औषध लॉन्च केले आहे

योग गुरु बाबा रामदेव यांनी 19 फेब्रुवारीला कोरोनाचे औषध 'कोरोनिल' लॉन्च केले होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. हे औषध आता बाजारातही उपलब्ध झाले आहे. पण, महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पतंजलीला मोठा धक्का बसला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून कोरोनिलच्या बंदीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 'पतंजलीच्या #Coronil औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर #IMA ने प्रश्न उपस्थित केले आहेत. #WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.'

'#WHO, #IMA व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या #Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही,' अशी माहिती त्यांनी दिली.

मेडिकल असोसिएशनचा आक्षेप

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पतंजलिच्या कोरोना व्हॅक्सीन कोरोनिलचे समर्थन केल्याप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. IMA ने सोमवारी म्हटले की, मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया (MCI)च्या नियमानुसार, कोणताच डॉक्टर कोणत्याच औषधाचे प्रमोशन करू शकत नाही. हर्षवर्धन स्वतः डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांनी नियमाविरोधात काम केले. कोरोनिलबाबत पतंजलिने केलेल्या दाव्यांचेही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) ने खंडन केले आहे.

काय म्हणाले WHO ?

WHO ने 19 फेब्रुवारीलाच स्पष्टीकरण दिले की, त्यांनी कोणत्याच ट्रेडिशनल मेडिसिनचे रिव्ह्यू केले नाही आणि कोणालाच सर्टिफीकेट दिले नाही. WHO साउथ-ईस्ट एशियाने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.

19 फेब्रुवारीला लॉन्च केले औषध

योग गुरु बाबा रामदेव यांनी 19 फेब्रुवारीला कोरोनाचे औषध लॉन्च केले होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. यादरम्यान, कोरोनाच्या फर्स्ट एविडेंस बेस्ड मेडिसिनवर सायंटिफिक रिसर्च पेपरदेखील सादर केला होता.

रामदेव बाबांचा दावा- औषध WHO सर्टिफाइड आहे

कार्यक्रमात पतंजलिचे को-फाउंडर आणि योग गुरू रामदेव बाबा यांनी दावा केला होता की, ही आयुर्वेदिक औषध WHO सर्टिफाइड आहे. याशिवाय, त्यांनी कोरोनिलला कोरोना उपचारातील चांगले औषध असल्याचाही दावा केला. ते म्हणाले की, या औषधाचे क्लिनिकल ट्रायलदेखील झाले. यानंतर पतंजलि आयुर्वेदचे मॅनेजिंग डायरेक्टर आचार्य बालकृष्ण यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, कोरोनिलसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फार्मास्युटिकल प्रोडक्ट सर्टिफिकेट (CPP) दिले आहे. WHO कोणत्याच औषधाला परवानगी देऊ किंवा नाकारू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...