आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भिडे गुरुजींचे शिवसेनेला समर्थन?:या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेनाच पाहिजे : संभाजी भिडे

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संपूर्ण देशात शिवसेना जावी ही बाळासाहेबांची आकांक्षा, ती पूर्ण करण्यासाठी खटपट केली पाहिजे : भिडे

या देशाला भारत म्हणून नाही, तर हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्यक असल्याचे मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले. ते सांगलीतील बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सांगलीतील एका चौकाचे नामकरणही करण्यात आले. याचाच संदर्भ घेऊन त्यांनी देशाचेच नामकरण करण्याचा मुद्दा मांडला.

संभाजी भिडे म्हणाले, “प्राणीमात्रांना जीवंत राहण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे, तसे या देशाला भारत म्हणून नाही तर हिंदुस्थान म्हणून जगायचे असेल, तर शिवसेना आवश्यक आहे. हे माझे राजकीय नाही, तर राष्ट्रीय मत आहे. हे लक्षात घेऊन आपण कामावर तुटून पडूयात. एका चौकाचे नाव काय पण संपूर्ण देशाचे नाव हिंदुस्थान नावाने ओळखला गेला पाहिजे. इतकी शिवसेना महत्त्वाची आहे.”

गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा पाहिजे

संभाजी भिडे म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरेंची जी आशा आकांक्षा होती की संपूर्ण देशात शिवसेना गेली पाहिजे. ही आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करायला हवी. गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा पाहिजे. लोकसेवक तत्पर पाहिजे. हा प्रवाह पुढे अखंड चालू राहिल यासाठी खटपट केली पाहिजे."

बातम्या आणखी आहेत...