आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडची टीका:राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला सपशेल अपयशी ठरलेला माणूस- गायकवाड

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेा होता. या विधानाला मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टवरून राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे. अशी टीका गायवकवाड यांनी केली आहे.

हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की, असेही गायकवाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...