आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रयत्नाला यश:सांगलीतील 400 वर्ष जुन्या झाडाला वाचवण्यासाठी महामार्गाच्या नकाशात बदल केला, स्थानिकांच्या आंदोलनाला यश

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
या झाडाखाली स्थानिक लोकांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते
  • वृक्ष वाचविण्यासाठी चिपको आंदोलन, सोशल मीडिया मोहीम आणि ऑनलाईन याचिका दाखल केली होती

सांगली जिल्ह्यातील भोसे गावात असलेले 400 वर्ष जुने वडाच्या झाडाला वाचवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या महामार्गाचा नकाशा बदलण्यात आला. या झाडाला वाचवण्यासाठी स्थानिक लोक अनेक दिवसांपासून आंदोलन करत होते. या दरम्यान स्थानिकांनी चिमको आंदोलन देखील केले. झाड कापण्यासाठी आलेल्या लोकांना रोखण्यासाठी लोक झाडाला मिठी मारून बसले होते. यासाठी सोशल मीडियावर मोहीमही सुरू करण्यात आली होती. झाडाला वाचवण्यासाठी काही लोकांनी ऑनलाइन याचिका दाखल केली होती. 14 हजार लोकांनी याचे समर्थन केले होते.

लोकांच्या भावना लक्षात घेता गडकरींनी नकाशा बदलला

रत्नागिरी - नागपूर निर्माणाधीन महामार्ग क्रमांक 166 सांगली जिल्ह्यातील भोसे गावात 'शिव कालीन वडाचे झाडाजवळून जात होता. यामुळे झाडाला हटवण्याचे कामही सुरू झाले होते. स्थानिक, सांगलीतील पर्यावरणवादी लोक व सामाजिक कार्यकर्त्यांनी झाड तोडण्यास विरोध केला. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही याची तक्रार केली. त्यांनी याबाबतची माहिती रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिली.

यानंतर लोकांच्या भावना लक्षात घेता हा वृक्ष वाचविण्यासाठी महामार्गाचा नकाशा स्वतः बदलून हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले आहेत. आता हा महामार्ग भोसे गावाऐवजी आरेखन गावाजवळून जाणार आहे. मात्र, याबाबत गडकरी यांनी माहिती दिली नाही. पण स्वत: आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.