आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sangali Corona News And Updates; Sambhaji Bhide, Founder Of Shiv Pratishthan, Made Shiv Sena MLA Remove His Face Mask

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना नियमांचे उल्लंघन:शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शिवसेना आमदाराला काढायला लावला तोंडावरचा मास्क

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका कार्यक्रमादरम्यान भिडे यांनी स्वतः मास्क घातला नव्हता आणि इतरांनाही काढायला लावला

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा प्रकार घडला आहे. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेना आमदार अनिल बाबर उपस्थित होते. यावेळी भिडे यांनी स्वतःही तोंडावर मास्क घातला नव्हता आणि अनिल बाबर यांनाही आपल्या तोंडावरचा मास्क काढायला लावला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावात एका भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. यावेळी शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. अनिल बाबर भूमिपूजन करत असताना संभाजी भिडे यांनी बाबर तोंडावरील मास्क काढण्यास सांगितला. यानंतर आमदारांनीही तोडांवरील मास्क काढून भूमिपूजन केले. विशेष म्हणजे यावेळी या कार्यक्रमात हजर असलेल्या इतर लोकांनीही तोंडावर मास्क लावला नव्हता. आता या प्रकारावर सांगली जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...