आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य:निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असे वक्तव्य त्यांनी केले. दारुची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम, नालायक असल्याचेही भिडे म्हणाले. दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

पुढे बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, 'आपला देश जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश आहे. मग आपल्या देशाचा पहिला क्रमांक कधी येणार? पण आपण तो मिळवला आहे. आपला कट्टर शत्रू असणारा चीन लोकसंख्येत पुढे आहे, त्यामुळे ते आपल्याला जमलेले नाही. पण निर्लज्जपणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत' असे देखील भिडे म्हणाले.

स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान

पुढे म्हणाले की, जगाच्या पाठीवर 187 राष्ट्रे आहेत. त्या राष्ट्रामध्ये पारतंत्र्य, गुलामी दास्याच्या ननरकात राहण्याचा बेशरमपणाचा वाटत नाही, लाज वाटत नाही अशा 123 कोटी लोकांचा देश जगामध्ये आहे. प्रदीर्घ काळ, परक्यांचा मार खात, स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान असे वक्तव्य देखील भिडेंनी केले आहे

बातम्या आणखी आहेत...