आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काँग्रेसमध्ये कलह:संजय झा यांना केले पक्षातून निलंबित, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याचा दिला होता सल्ला 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पायलट यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणीही ट्विटरद्वारे केली होती
  • संजय झा हे 2013 पासून कॉंग्रेसचे प्रवक्ते होते

महाराष्ट्र कॉंग्रेसने संजय झा यांना मंगळवारी रात्री पक्षाच्या सदस्यतेवरुन निलंबित केले. झा पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राहिलेले आहेत. अलीकडे राजस्थानच्या राजकीय नाट्यादरम्यान संजय झा यांनी काही सूचना दिल्या होत्या. झा यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहिला होता आणि मंगळवारी टीव्ही चॅनेलच्या चर्चेत कॉंग्रेसवर टीका केली.

झा यांच्या पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे कॉंग्रेसकडून बोलले जात आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रमुख बाळासाहेब थोरात यांनीही निवेदन जारी केले.

झा म्हणाले होते - मी सचिन यांच्यासोबत 

डिबेटमध्ये संजय झा म्हणाले की होते की, मी सचिन पायलट यांच्या बरोबर आहे. सत्य पहा ... 2013 च्या विधानसभा निवडणुकीत अशोक गहलोत हे मुख्यमंत्री होते. भाजपला 163 जागा आणि कॉंग्रेसला 21 जागा मिळाल्या. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडे 73 आणि कॉंग्रेसला 100 जागा आहेत.

पायलट यांना मुख्यमंत्री बनविण्याची मागणीही ट्विटरद्वारे केली होती 

मंगळवारी संजय झा यांनी ट्विटद्वारे सचिन पायलट यांना राजस्थानमध्ये मुख्यमंत्री करावे असा सल्ला दिला होता. ते म्हणाले की, तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक गहलोत यांना मोठी जबाबदारी देण्यात यावी. जिथे काँग्रेस कमकुवत आहे अशा राज्यांची जबाबदारी गहलोत यांच्यावर सोपविली पाहिजे. राजस्थान प्रदेश कॉंग्रेससाठी नवीन अध्यक्ष नेमले जावेत.

गेल्या महिन्यात प्रवक्तापदावरून काढून टाकले होते

गेल्या महिन्यात जूनमध्ये इंग्रजी दैनिकात लेख प्रकाशित झाल्यानंतर लगेचच कॉंग्रेसने झा यांना पक्षाच्या प्रवक्त्या पदावरून काढून टाकले होते. मंगळवारी एका टीव्ही डिबेटमध्ये कॉंग्रेस नेते संजय झा यांनी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या नाट्यावर आपला सल्ला दिला होता. 

संजय झा हे 2013 पासून कॉंग्रेसचे प्रवक्ते होते

झा हे 2013 पासून कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते होते आणि टीव्ही डिबेट आणि पॅनेल चर्चेत त्यांनी कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व केले. ते महाराष्ट्रातील अखिल भारतीय व्यावसायिक कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. झा भारतातील डेल कार्नेगी प्रशिक्षण ऑपरेशन्सचे कार्यकारी संचालक आहेत.