आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा वादानंतर प्रथमच मीडियासमोर:'मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारे राजकारण आहे'; 15 दिवसानंतर संजय राठोड यांनी 'त्या' प्रकरणावर सोडले मौन

वाशिम5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे'

टीकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात अडकलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे गेले अनेक दिवस नॉट रिचेबल होते. आज अखेर ते सर्वांसमोर अवतरले. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे. 'एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका', अशी विनंती संजय राठोड यांनी यावेळी केली.

यावेळी संजय राठोड म्हणाले की, 'पूजा चव्हाण प्रकरणात माझी आणि माझ्या समाजाची बदनामी केली जात असून, हे घाणेरडे राजकारण सुरू आहे. एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका, अशी विनंती संजय राठोड यांनी हातजोडून केली. राठोड पुढे म्हणाले की, 'पूजा चव्हाण या गौर बंजारा समाजातील तरुणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत मला दु:ख आहे. चव्हाण परिवाराच्या दु:खात माझा समाज आणि कुटुंब सहभागी आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्रात घाणेरडे राजकारण सुरू आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारे हे राजकारण आहे', असे राठोड म्हणाले.

यावेळी संजय राठोड यांनी अरुण राठोडसोबत असलेल्या फोटोवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'मी चार वेळा निवडून आलो आहे. गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात आहे. माझ्यावर समाजाचे प्रेम आहे. त्यामुळे अनेक लोक येतात आणि माझ्यासोबत फोटो काढतात. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. पोलीसही तपास करत आहेत. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. पण समाजाची आणि माझी वैयक्तित बदनामी करू नका', असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...