आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत पुन्हा कडाडले:‘मुलांमुळेच नारायण राणेंचं नुकसान, त्यांची मुलं उठसूट इतरांचे बाप काढतात, तुम्ही काय बिनबापाचे आहात काय?’

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री ठाकरे यांना धमी देणाऱ्या नारायण राणे यांच्यावर कायद्यावे कारवाई केली. राणे यांच्यावरील कारवाई म्हणजे घटनाबाह्य असल्याचे तारे भाजप नेते तोडतात तेव्हा आश्चर्य वाटते. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री असोत, त्यांचा जाहीर उपमर्द कोणालाच नाही. राणे हा अपराध वारंवार करती राहिले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हा कोणाला गुन्हा वाटत असेल तर ते भारतीय संविधानास कुचकामी ठरवत आहे. असे टीकास्त्र संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र रोखठोकमधून सोडले आहे.

केंद्रातले एक मंत्री श्री, नारायण राणे महाराष्ट्रात भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी आले. त्या यात्रेची त्यांनी येड्यांची जत्रा केली. मोदी सरकारातील अनेक मंत्री देशभरात अशा जन आशीर्वाद यात्रा करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील फिरत आहेत. त्या सर्व यात्रा सुरळीत पार पडत आहेत. फक्त राणे यांनी परंपरेने गोंधळ घातला अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

गुजरात निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच’ असा करताच भाजपने मोठाच हल्लाबोल केला. मोदी तर जाहीर सभांतून ”मला ते नीच म्हणाले हो म्हणून अश्रू ढाळत होते. मणिशंकर यांच्या ‘नीच’ शब्दाची गांभीर्याने दखल घेऊन काँग्रेसने अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्याची हिंमत व नैतिकता दाखविली. नारायण राणे यांनीही तोच गुन्हा केला, पण भाजप त्यांना सरळ पाठीशी घालत आहे, असा टोलाही राऊत यांनी रोखठोखमधून लगावला आहे.

राणे यांची मुले इतरांचे बाप ऊठसूट जाहीरपणे काढतात. 'तुम्ही बिनबापाचे आहात काय? असा प्रश्न त्यांना एक दिवस भारतीय जनता पक्षाचे लोकत विचारतील तेव्हा ते काय उत्तर देतील? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे गढून प्रवाह थांबले नाहीत तर राज्याची बदनामी होईल. असेही राऊत अग्रलेखातून म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...