आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रीया:'हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, शरद पवार त्यांच्या कुटुंबातील प्रश्न सोडवण्यास सक्षम'- संजय राऊत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे नातू पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. यावर अनेकांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी पार्थ पवार प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. 'शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्यांनाच पाहू द्या', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

यादरम्यान संजय राऊत म्हणाले की, 'इतर पक्षातील प्रमुखांना सल्ला देण्याचे माझे काम नाही. सामना एक वृत्तपत्र आहे. आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यावर भाष्य करायचे काम मी करत असतो. खरंतर तो विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. शरद पवार यांच्या कुटुंबातील अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर बाहेरच्यांनी बोलू नये. पवार कुटुंब आणि त्यांचा पक्ष हे त्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी सक्षम आहेत. त्या विषयावर त्या पक्षाचेच प्रवक्ते बोलतील,' असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...