आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग प्रकरण सीबीआयकडे वर्ग करा. असे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेल्या याचिकेप्रमाणे त्यांना कारवाईपासून संरक्षण देखील मिळाले. याचबरोबर त्यांनी आपल्यावर सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणी देखील सर्वोच्च न्यायालयाकडे मान्य केली. दरम्यान याच मुद्दाला धरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. हा राज्य सरकारला धक्का नाही. तर कोणाला तरी दिलासा देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. असे संजय राऊत म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपण्यात यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना दिले आहे. तसेच सिंग यांना कारवाईपासून संरक्षण देखील मिळाले आहे. यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
खासदार संजय राऊत काय म्हणाले?
आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल हा राज्य सरकारला धक्का नाही. तर कोणाला तरी दिलासा देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. 'किसी को राहत देने की एक और कोशिश है...जब जब महाराष्ट्र सरकार असली गुन्हेगारों तक पहुंचने की कोशिश करती है, ॲक्शन लेने की कोशिश करती है. तो इस प्रकार से दिलासा मिलता है'. दिलासा एकाच पक्षातील लोकांना कसा काय मिळतो हे आश्चर्य आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, आमचे पोलिस सक्षम आहेत. महाराष्ट्र पोलिस निष्पक्ष तपास करू शकत नाहीत, असा ठपका आपण कसा ठेवू शकता. महाराष्ट्र पोलिस देशातील सर्वात जास्त निष्पक्ष पोलिस आहेत. तरी त्यांच्यावर अशा प्रकारचा ठपका ठेवून कुठेतरी महाराष्ट्राच्या विरोधात खूप मोठ षड्यंत्र रचले जात आहे. राज्यावर कटकारस्थान केले जात आहे. हे दुर्दैव असल्याचे राऊत म्हणाले.
महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्राचे पोलिस या सर्व प्रकरणांमध्ये एका विशिष्ट निर्णयापर्यंत, तपासाच्या एका टोकापर्यंत आल्यावरती असे दिलासे मिळत आहेत. असे दिलासे मग इतरांना का मिळत नाहीत. जेव्हा जेव्हा पोलिस मुख्य आरोपीवर कारवाईपर्यंत येतात तेव्हा दिलासा मिळतो. सुबोध जयस्वाल यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांना राज्याची परिस्थिती पूर्णपणे माहिती आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
परमबीर सिंगांवरील पाच गुन्ह्यांचा होणार तपास
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये परमबीर सिंग यांच्यावर खंडणी आणि अन्य आरोपांखाली गुन्हे दाखल झाले होते. आतापर्यंत परमबीर सिंग यांच्यावर दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांचा तपास आता सीबीआयकडे जाणार आहे. हा ठाकरे सरकार आणि राज्यातील तपास यंत्रणांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
परमबीर सिंग यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. तब्बल सात महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करणे आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत. परमबीर यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह खंडणी, गोरेगाव खंडणी आणि ठाणे खंडणी अशा तीन प्रकरणांत त्या-त्या न्यायालयांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. गोरेगाव प्रकरणात न्यायालयाने परमबीर यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतरच त्यांच्यावर न्यायालयासमोर हजर होण्यासाठी दबाव निर्माण झाला. त्यानंतर परमबीर सिंग अज्ञातवासातून बाहेर आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.