आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sanjay Raut । Kirit Somaiyya । Send Kirit Somaiya To Kashmir, We Will Give The Documents Of The Decadent MP Sanjay Raut

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच:'किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा, दशतवाद्यांचे कागदपत्रे आम्ही देऊ'; काश्मीरच्या परिस्थितीवरून खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये गेल्या पंधरवाड्यापासून दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरुच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी पुन्हा दोन परप्रांतीय मजुरांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. त्यामुळे आता सर्व परप्रांतीय मजुरांना काश्मीरच्या खोऱ्यातून सुरक्षा दलाच्या छावण्यांमध्ये दाखल केले जात आहे. दहशतवाद्यांनी आतापर्यंत 11 जणांची हत्या केली आहे. त्यावर आता शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले की, 'कधी काश्मिरी पंडितांना मारले जात आहे. ही जबाबदारी केंद्र सरकार तसेच गृहमंत्रालयाची आहे. याच्यावर तोडगा निघाला नाही तर नुसत्या पाकिस्तानच्या बाबतीतील धमक्यांची भाषा वापरून हे थांबले जाणार नाही. चीन लडाखमध्ये घुसले आहे. सांगा की चीनवर सर्जिकल स्ट्राईक करू म्हणून. काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढंच मी सांगू शकतो. पाकिस्तानसोबत कसे संबंध प्रस्तापित करायचे याचा निर्णय सरकारला एकदा घेऊद्या मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या मतलबाप्रमाणे राजकीय सोईच्या भूमिका घेता आणि काश्मिरची जनता रोज तिथे मरते आहे. हे चालणार नाही.

कलम 370 रद्द झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली की नाही हे आता सांगता येणार नाही. तिथल्या परिस्थितीसंदर्भात बातम्या बाहेर येऊ दिल्या नाहीत. तिथे इंटरनेट बंद होते. तिथे अनेक बंधने होती. त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जात असताना सरकार काय करत आहे हे गृहमंत्र्यांनी समोर येऊन सांगावे, असे संजय राऊत म्हणाले आहे.

'ईडी, सीबीआय, एनसीबीला जम्मू काश्मीरला पाठवा. खूप शक्तिशाली लोक आहेत दहशतवादी पळून जातील. तुम्ही इथे आमच्या सरकारवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत आहात. तुम्ही या संस्था बदनाम केल्या आहेत.

किरीट सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मिर फिरत बसतील. शरद पवारांविषयी चंद्रकांत पाटील यांनी ज्या शब्दामध्ये उल्लेख केला हे शोभते का? काश्मिरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोला. त्यांना दम द्या आम्हाला शहाणपणा शिकवू नका. महाविकास आघाडीतील नेत्यांनी नुसती खुर्च्यावर बसू नका' असा टोला देखील संजय राऊतांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...