आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा राऊतांवर वार:संजय राऊतांच्या पत्नीने PMC बँक घोटाळ्यातील आरोपीच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ED ने वर्षा राऊत यांची केली होती चौकशी

शिवसेना खासदार संजय राउत यांच्या पत्नी वर्षा राउत यांनी PMC बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राउतच्या पत्नीकडून घेतलेले 55 लाख रुपये परत केले आहेत. अंमलबजावनी संचालनालयाने(ED)4 जानेवारीला या पैशांबाबत वर्षा राऊत यांची तीन तास चौकशी केली होती.

या प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमैया यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. सोमैयांनी सोशल मीडियावर लिहीले, 'संजय राउत म्हणत आहेत की, त्यांच्या पत्नीने पूर्ण पैसे परत केले आहेत. पण, त्यांना हिशोब द्यावा लागेल. अखेर संजय राऊतांना पैसे परत करावेच लागले.'

ED ने वर्षा राऊत यांची केली होती चौकशी

हे संपूर्ण प्रकरण PMC बँक घोटाळ्याशी संबंधित आहे. आरोप असा आहे की, या प्रकरणातील आरोपी प्रवीण राउतच्या पत्नी माधुरीसोबत वर्षा राउत यांचा 55 लाख रुपयांचा व्यवहार झाला होता. प्रवीणने माधुरीला 1 कोटी 60 लाख रुपये दिले होते, त्यातील 55 लाख रुपये त्यांनी वर्षा राऊत यांना दिले. संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, त्यांनी हे पैसे कर्ज स्वरुपात घेतले होते. या पैशांतून राऊत यांनी दादरमध्ये एक फ्लॅट घेतला होता. हेदेखील समोर आले की, वर्षा आणि माधुरी प्रवीण राऊत यांच्या 'अवनी कंस्ट्रक्शन' नावाच्या कंपनीत पार्टनर आहेत.

बातम्या आणखी आहेत...