आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Sanjay Raut On Farmer Protest ; 'Law And Order Has Been Disrupted In Delhi, The Should Give Resignation' Sanjay Raut

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केंद्रावर निशाना:'दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, राजीनामा तो बनता है साहेब'-संजय राऊत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीत शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊतांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी बॅरिकेडची तोडफोड करत लाल किल्यावर खालसा पंथाचे झेंडे फडकावले. यावेळी अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. दरम्यान, दिल्लीतील घटनेवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 'दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राजीनामा तो बनता है साहेब', अशी मागणी संजय राऊत यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केली आहे.

संजय राऊत यांनी तीन ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.'दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार?सोनीया गांधी. ममता बॅनर्जी. उद्धव ठाकरे. शरद पवार की ज्यो बाईडनचा? इस बात पर राजीनामा तो बनता है साहेब..', असे राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणतात की, 'सरकार याच दिवसाची वाट पाहत होते का ? सरकारने अखेरपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणने ऐकलेच नाही. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आपल्या देशात आहे ? ही लोकशाही नाही, दुसरचं काहीतरी सुरू आहे,' असे राऊत म्हणाले.

तिसऱ्या पोस्टमध्ये राऊत म्हणतात की, सरकारच्या मनात असते तर आजची हिंसा थांबवता आली असती. दिल्लीत जे काही सुरू आहे. त्याचे कुणीच समर्थन करू शकत नाही. कुणीही लाल किल्ला आणि तिरंग्याचा अवमान सहन करणार नाही. पण वातावरण का बिघडले? सरकार शेतकरी विरोधी कायदे रद्द का करत नाही? यामागे काही अदृश्य हात राजकारण करत आहेत का?' असे सवालही राऊत यांनी उपस्थित केले.