आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षप्रवेश:'आमचे काही नगरसेवक राष्ट्रवादीत गेले, याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही'- संजय राऊत

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव असल्याचं चर्चा रंगल्या आहेत, यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, 'पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही,' असे मत राऊत यांनी मांडले.

पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावरुन दोन्ही पक्षात कुरबूर सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पारनेरच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. हा स्थानिक स्तरावरचा विषय होता, तो त्या पातळीवरच संपायला हवा होता. आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असे मला वाटते. स्थानिक राजकारणाचा भाग होता. यापुढे असा निर्णय घेताना एकमेकांशी बोलावे. काही गोष्टी अनावधनाने घडत असतात. त्या प्रसंगाचे काय होईल याची कल्पना नसते, जिथे व्हायची तिथे चर्चा झाली आहे. त्यामुळे कुरबुरी, धूसफूस आहे असे बोलू नये."

'मुख्यमंत्र्यांचे सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. मुंबई पोलिसातील बदल्यांचे कुणीही राजकारण करू नये, त्यावरुन काही वाद नाही. तसेच महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत. महाविकास आघाडीत अंतर्विरोध, अंतरपाट नाही, आम्ही वरमाला घातल्या आहेत. तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवले आहे, ही खिचडी नाही, हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास करत देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्यांचा अर्थ तितकासा खरा नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

'महाविकास आघाडीत खटके उडत नाहीत, खटका हा शब्द आम्ही नाही, मीडियाने वापरला. महाविकास आघाडीत समन्वय समिती आहे. त्यात तिन्ही पक्षाचे दोन-दोन प्रमुख नेते आहेत, कोरोनामुळे संवाद कमी झाला आहे, मात्र तिन्ही पक्ष एकत्रपणेच चर्चा करुन निर्णय घेतात', असेही राऊत यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...