आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धार्मिक स्थळे:देव मंदिरात बंदिस्त व्हावे अशी आमची भूमिका नाही; आर्थिक उलाढाल थांबल्याची आम्हालाही चिंता- संजय राऊत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे मागील अनेक दिवसांपासून धार्मिक स्थळे बंद आहेत. या धार्मिक स्थळांना उघडण्याची मागील अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बातचीतदरम्यान आपली प्रतिक्रीया दिली आहे. 'मंदिरावर अनेकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत, आर्थिक उलाढाल थांबल्याची आम्हालाही चिंता आहे, असे राऊत म्हणाले.

यावेळी राऊत म्हणाले की, 'मंदिरे बंद करण्याचा निर्णय केंद्राचा होता. मधल्या काळात मंदिरे अचानक उघडली तेव्हा काय झाले? राम मंदिराचे भूमिपूजन, तिरुपती या ठिकाणी कोरोनाचा प्रसार वाढला. देवाला मंदिरात बंदिस्त करण्याची आमची भूमिका नाही. मंदिराचेही अर्थकारण असते, अनेकांचे उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहेत.मंदिराबाहेरील हार- फुले विकणारे, प्रसादाची दुकाने लावणारे आणि इतर अनेकांचे पोट मंदिरावर आहे. आम्हालाही याची चिंता आहे. मंदिर हे उदरनिर्वाहाचेच साधन आहे, ' असेही संजय राऊत म्हणाले.