आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचा वार:'देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये, काही गोष्टी घरातच राहायला हव्यात'- संजय राऊत

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'विरोधी नेत्याचा आक्रमकपणा राज्याच्या मुळावर येऊ देऊ नये'

महाराष्ट्रात सध्या मनसुख हिरेन आणि अँटिलिया प्रकरणासोबतच पोलिस खात्यातील बदल्यांचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमिवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. याच मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. 'देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात, असे राऊत म्हणाले.

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'रश्मी शुक्ला प्रकरणी फडणवीस तोंडावर पडले आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्र्यांना भेटण्याची गरज नव्हती. त्यांनी त्यांची लढाई महाराष्ट्रातत ठेवायला हवी होती. तुम्ही फक्त नागपूरचे नेते नाहीत, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात. आम्ही तुमच्याकडे भविष्यातील राष्ट्रीय नेते म्हणून पाहातो. त्यामुळे तुम्ही वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात. जेव्हा वारंवार महाराष्ट्राचा नेता या मर्यादा ओलांडतो आणि दिल्लीकडे तोंड करून बघतो तेव्हा सह्याद्रीचे शिखर ओशाळल्यासारखे वाटते, असे राऊत म्हणाले.

विरोधी नेत्याचा आक्रमकपणा राज्याच्या मुळावर येऊ देऊ नये

राऊत पुढे म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस अनुभवी नेते आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळणे फडणवीसांचे भाग्य होते. त्यातून त्यांनी उत्तम प्रकारे कामे केली. त्यातून त्यांना एक अनुभव मिळाला, हा अनुभव त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून देखील वापरायला हवा. विरोधी पक्षनेत्याने आक्रमक व्हावे, पण आक्रमकपणा राज्याच्या प्रतिष्ठेच्या मुळावर येईल इतका नसावा. चुका सुधारण्याची संधी दिली पाहिजे', असेही राऊत म्हणाले. टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...