आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:'पार्थ पवार यांच्या मतावर त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने प्रतिक्रीया दिली आहे'- संजय राऊत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शरद पवारांचे कोणतेच विधान निरर्थक नसते, मीडियाने यात पडण्याची गरज नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे पार्थ पवारांना जाहीररीत्या फटकारल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. यानंतर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रीया दिली आहे.

यावेळी राऊत म्हणाले की, 'शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली, एखादे वक्तव्य केले तर त्यावर फार चिंता करण्याची गरज नाही. पवारांचे कोणतेच विधान निरर्थक नसते. त्यांचा अनुभव, त्यांची ज्येष्ठता, या देशाच्या राजकारणावरील त्यांचे स्थान पाहिल्यावर यामध्ये मीडियाने न पडलेले बरे', असे मत त्यांनी बोलून दाखवले.

राऊत पुढे म्हणाले की, 'पार्थ पवारांच्या भूमिकेवर मी कशाला बोलू ? त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने त्यावर मत व्यक्त केले आहे. मी त्यावर काहीच बोलणार नाही. पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. ते लोकसभेचे उमेदवार होते. ते पवार कुटुंबातील घटक आहेत. त्यांनी मत व्यक्त केले, त्यावर त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना जे सांगायचे होते ते त्यांनी सांगितले.'

सुशांत प्रकरणात काही लपवण्यासारखे नाही

यावेळी अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले की, 'सुशांत सिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस योग्य प्रकारे करत आहेत. मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर शंभर टक्के विश्वास आहे, असे पवार म्हणाले आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीही तेच सांगितले आहे. मुंबई पोलिसांचा तपास सुरु असताना सीबीआयची मागणी करणे चुकीचे आहे. हे महाराष्ट्राच्या अधिकारावर आक्रमण आहे. या प्रकरणात लपवण्यासारखे काही नाही. मुंबई पोलिसांनी जो तपास केला, त्या तपासाच्या पलिकडे सीबीआयसाठी काही शिल्लक असेल, असे आम्हाला वाटत नाही', असे मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...