आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राकडून कायद्याचा गैरवापर:तूमची वेळ संपली! संजय राऊतांना राज्यसभेत बोलतांना सभापतींनी रोखले, वक्तव्य रेकॉर्डवर घेणार नसल्याची माहिती

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेत संजय राऊत केंद्र सरकारवर निशाणा साधताना त्यांना सभापतींनी थांबविले. तुमची वेळ संपली असे सांगत असतानाच राऊत बोलताना पाहून तुमचे बोलणे रेकॉर्डवर येणार नसल्याचे सभापतींनी संजय राऊतांना खडसावले. यावर राऊतांनी केंद्र सरकार कायद्याचा गैरवापर करीत नाही हे तुम्ही डोळ्यात डोळे घालून सांगू शकता का? असा उलट सवाल सभापतींना केला. ​​​​​​

​राज्यसभेत आज ही खडाजंगी झाली. मला राज्यसभेत बोलु दिले नाही असेही संजय राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?
केंद्राविरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ईडीने संजय राऊतांवर कारवाई केल्यानंतर आज राज्यसभेत त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. यावेळी राऊतांनी बोलताना डोळ्यात डोळे घालून सांगू शकता का, की केंद्र सरकार कायद्याचा गैरवापर करत नाहीये असा सवाल केला. यावेळी राऊतांना राज्यसभेत बोलताना सभापतींनी तुमची वेळ संपली आहे असे सांगत रोखले. मात्र तरीही संजय राऊत बोलत असल्याचे पाहून तुमचे बोलणे रेकॉर्डवर येणार नसल्याचे सभापतींनी त्यांना सांगितले.

ईडीकडून संजय राऊतांची संपत्ती जप्त
राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती मंगळवारी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे, दादरमधील एक फ्लॅटचा त्यात समावेश आहे. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आलीय. दरम्यान, संपत्ती जप्त करण्यात आल्यानंतर संजय राऊतांकडून भाजपवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय.

ईडीवरील भाष्य राऊतांना भोवले?
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ईडीचे अधिकारी युपीत भाजपच्या टिकीटावर निवडणूक लढवत आहेत. जवळपास 50 उमेदवारांचा खर्च हे अधिकारी करत आहे. असा आरोप ईडीवर केला होता. ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे, मी अतिशय जबाबदारीने हे वक्तव्य करतोय, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. हे वक्तव्य राऊतांना भोवले काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर आज त्यांना राज्यसभेत बोलू न दिल्याने ते बॅकफुटवर गेले आहेत का? अशी चर्चा दिल्लीच्या राजकारणात सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...